न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ नोव्हेंबर २०१९) :- शाहूनगर, चिंचवड येथील श्री. शिव चिदंबरम महास्वामी सेवा समिती च्या वतीने आज सोमवारी (दि. १८) रोजी श्री चिदंबरम महास्वामी जन्मसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आज दिवसभर होणाऱ्या कार्यक्रमात प्रामुख्याने श्री प्रतिष्ठापना, काकड आरती, महापूजा, नैवद्य महाप्रसाद तसेच जन्मोत्सव दुपारी १२.०० वा. होणार आहे. सर्व भाविक-भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सेवा समिती च्या वतीने करण्यात आले आहे.












