न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पिंपरी चिंचवड सायन्स पार्क जवळील जागेत तारांगण प्रकल्पाचे काम सुरु आहे. तारांगणकरीता यंत्रसामुग्री बसविणेकरीता Hybrid Projection System, Projection Dome, Projector व अन्य उपकरणे जपान, अमेरीका व फ्रान्स या देशातून आयात (Import) करण्यात आलेली आहे.
सदरचे साहित्य परदेशातून आयात (Import) केल्यामुळे सदर साहित्य Custom विभागाकडून सोडविणेकामी आयात शुल्काची होणारी र.रु. ३.१९ कोटी एवढी रक्कम शासनास भरावी लागणार होती. तारांगण प्रकल्प हा शैक्षणिक विषय असल्याने पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने आयाताशुल्कामध्ये विशेष प्रयत्न करुन सवलत मिळवली. सवलत मिळाल्यामुळे फक्त ५६.६७ लाख एवढाच आयातशुल्क शासनास भरावे लागले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची एकुण र.रु. २.६२ कोटी एवढ्या रकमेची बचत झालेली आहे.
यंत्रसामुग्री आयात करताना आयातशुल्कामध्ये सुट मिळाल्यास त्याचा फायदा कंत्राटदारास न होता पिंपरी चिंचवड महानगरपालिका घेईल असे निविदेमध्ये पूर्वीच अट नमुद करण्यात आली होती, असे पिंपरी चिंचवड महापालिका सह शहर अभियंता यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.















