न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०१९) :- भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास मनसे गटनेते सचिन चिखले, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर,
नगरसदस्या अनुराधा गोरखे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी राजेश आगळे, लेखाधिकारी प्रदिप बाराथे आदी उपस्थित होते. यावेळी पदाधिकारी व कर्मचा-यांनी राष्ट्रीय एकात्मताची शपथ घेण्यात आली.
माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.















