न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०१९) :- कुदळवाडी, चिखली भागातील कुदळवाडी ते मोई रस्ता तसेच चिखली ते मोशी परिसरात महापालिकेच्या वतीने नो पार्कीगचे फलक बसविण्यात आले आहेत. ‘फ’ प्रभागाचे स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांच्या प्रयत्नामुळे परिसरात नो-पार्किंग चे फलक बसवण्यात आले.
या परिसरातील रत्याच्या कडेला मालवाहतूक करणारे मोठ-मोठे ट्रक विनापरवानगी ट्रकमालक लावत होते. दोन्ही बाजूला वाहने उभी केल्यामुळे रस्ता अरुंद होऊन, वाहतूकीस अडथळा निर्माण होत होता. तसेच त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढत होते.
याबाबत स्वी. नगरसेवक दिनेश यादव म्हणाले की, वारंवार वाहतुक पोलींसाकडे याबाबत पाठपुरावा केला. परंतू, वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या बाजूला नो-पार्कीगचे फलक नसल्यामुळे कारवाई करण्यास नकार दिला. त्यामुळे या परिसरातील कुदळवाडी, चिखली भागातील रत्यांच्या कडेला नो-पार्कीगचे फलक बसविण्यात यावेत, अशी मागणी महापालिका आयुक्त हर्डीकर यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आयुक्तांनी कार्यवाही केली.















