न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी-चिंचवडमधून जाणाऱ्या नाशिक- पुणे या महामार्गावर एसटी बस आणि ट्रकचा आज (बुधवार) पहाटे भीषण अपघात झाला. या घटनेत एसटी बस वाहकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन प्रवासी जखमी झाले आहेत.
पहाटे धुक्यांमुळे रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक न दिसल्याने, भरधाव वेगातील बस थेट ट्रकला पाठीमागून धडकल्याने हा भीषण अपघात घडला. याप्रकरणी बस चालकाला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अंबादास दिनकर खेडकर (वय-३२) असे मृत्यू झालेल्या बस वाहकाचे नाव आहे. तर गंगाराम दिनकर सानप असे जखमी बस चालकाचे नाव आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.


















