न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि, २३ नोव्हेंबर २०१९) :- अखेर सत्तास्थापनाचा तिढा सुटला असून राष्ट्रवादी काँग्रेसने अनपेक्षित रित्या भाजपला पाठिंबा दिला आहे. आज पहाटेच या नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत.
आज शनिवारी (दि २३) रोजी पहाटे मुंबईतील राजभवनात भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून, उपमुख्यमंत्री पदी राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला कि, अजित पवार यांनी पक्षाचा मोठा गट फोडून भाजपला पाठिंबा दिला, याबाबत थोड्याच वेळात स्पष्टता होईल.












