न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०१९) :- वाहनांची रहदारी थांबवुन दोन शिक्षकांनी रस्त्यामधून निघालेल्या कासवाचे प्राण वाचवले. ही घटना चिखलीच्या साने चौकाजवळ घडली.
चिखलीकडुन साने चौकाकडे विकास ओव्हाळ आणि विशाल गाढवे हे दोन शिक्षक येत असताना त्यांना एक कासव संथगतीने रस्त्यावरून चालताना दिसले.
भरधाव वाहनाच्या खाली हे कासव सापडू नये म्हणून त्यांनी त्वरित रस्त्यावरील वाहतूक थांबवली. त्या कासवाला अलगद उचलून घेतले.आणि संत बहिणाबाई चौधरी उद्यानाकडे सोपवण्यात आले.












