न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०१९) :- घनकचऱ्याचे प्रदूषण व त्याची योग्य विल्हेवाट ही जगापुढील एक मोठी समस्या बनली आहे. येणाऱ्या काळाची गरज ओळखून चिंचवड मधील ओरिएंटल मार्वल या सोसायटी ने तयार होणाऱ्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापनाची सुरुवात करून या कामी पुढाकार घेतला आहे. ओरिएंटल मार्वल हि चिंचवडगाव केशवनगर मधील १५५ सदनिका असलेली गृहनिर्माण संस्था आहे.
ही मोहीम सुरु करण्यापूर्वी सोसायटीने कचरा व्यवस्थापन समिती चे गठन करून आराखडा बनवला. समिती मध्ये महिलांचा सहभाग असेल याची काळजी घेतली गेली. कोणतीही मोहीम यशस्वी करण्या साठी सर्व सदस्यांचा सहभाग जरुरीचा असतो. या साठी सोसायटी मध्ये जागरूकता मोहीम राबवण्यात आली. या कामात पी. सी. एम. सी. प्रभाग १८ चे आरोग्य निरीक्षक श्री. कांचनकुमार इंदलकर यांची मोलाची साथ मिळाली. त्यांनी स्वतः सोसायटी मध्ये येऊन सभासदांना मार्गदर्शन केले. तसेच चिंचवड मधील गोखले वृन्दावन सोसायटीतील श्री. केळकर आणी श्री. वैद्य यांनी त्यांचे कचरा व्यवस्थापनाचे अनुभव सांगून मोलाचे मार्गदर्शन केले. जागरूकता आणी प्रशिक्षण झाल्यानंतर सर्व सभासदांना कचरा वेगळा करूनच कामगारांना देण्याचे आवाहन करण्यात आले. या आव्हानास सर्व सभासदांनी उस्फुर्तपणे प्रतिसाद देत तीन दिवसांमध्ये ओला आणी सुका कचरा वेगळा करण्यात यश मिळवले.
याच मोहिमेचा एक भाग म्हणून सोसायटी मध्ये दि. २४ नोव्हेंबर रोजी “पुर्णम इकोव्हिजन फौंडेशन” यांच्या सहयोगाने इ – कचरा व प्लास्टिक कचरा जमा करण्याची मोहीम राबविली. पुर्णम संस्था या कचऱ्याचे योग्य पद्धतिने प्रक्रिया व पुनर्वापर करणारी सामाजिक संस्था आहे. या मोहिमेला सुद्धा सोसायटीतील सभासदांनी भरघोस प्रतिसाद देत दोन तासांत १०० किलो इ – कचरा आणी प्लास्टिक जमा केले. हि मोहीम यशस्वी होण्यासाठी आणी लहान मुलांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सोसायटी मध्ये स्वच्छता व कचरा व्यवस्थापन या विषयावर चित्रकला व प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास सोसायटीतील जवळपास ५० मुलांनी सहभाग घेतला. जमा केलेल्या वस्तूंची पुर्णम संस्थे तर्फे योग्य ती प्रक्रिया व पुनर्वापर केला जाऊन पर्यावरण व सामाजिक बांधिलकीचे भान राखले जाते.
या पुढील मोहिमेत सोसायटीने तयार होणाऱ्या ओल्या काचऱ्याचे सोसायटीच्या आवारातच प्रक्रिया करून खत निर्मिती करण्याचे उद्धिष्ट ठेवले आहे . सर्व सभासदांचा प्रतिसाद पाहता सोसायटी हे पण उद्धिष्ट यशस्वीपणे साध्य करेल यात शंका नाही.