न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०१९) :- राज्यस्तरीय कला गौरव महोत्सव २०१९ यांच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार यंदा पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांना प्रदान करण्यात आला.
पन्हाळा, कोल्हापूर येथे महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध वास्तुविशारद आनंद पिंपळकर, पन्हाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रुपाली धडेल, महाराष्ट्र क्रांतीसेनेचे सचिव प्रणय सावंत, अभिनेते सुरेश डाळे, राज्य कृषी पणन महामंडळाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले, माध्यमिक शिक्षणअधिकारी किरण लोहार, अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या उपाध्यक्षा मेघा डोळस, दिग्दर्शक महेश्वर मेटांबे, सतीश वाघ आदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना अरुण पवार यांनी सांगितले, की आपण समाजात वावरताना समाजाची बांधिलकी जपली जावी. आपण समाजाचे काही देणे लागतो, या उद्देशाने काम करीत राहिले पाहिजे.
सूत्रसंचालन महेंद्र कुलकर्णी यांनी, तर आभार विलास कोळेकर यांनी मानले.















