- राष्ट्रवादीचे पिंपळे सौदागरमधील कार्यकर्ते संदीप काटे यांची भावना
- महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे पवार साहेब आणि दादांना दिल्या शुभेच्छा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०१९) :- राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना अभुतपूर्व यश आले. यामुळे पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या संबंध कार्यकर्त्यांना उर्जा मिळाली आहे. एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये वयाची ८० ओलांडत असताना सत्तेसाठी पवारसाहेबांनी जे अटोकाट कष्ट घेतले, ते माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला नेहमीच प्रेरणादायी ठरतील, अशी भावना पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या निर्णयक्षमतेमुळे पिंपरी-चिंचवडचा विकासात्मक कायापालट झाला. पिंपरी-चिंचवड शहर आणि अजित पवार यांचे अतूट नाते आहे. शहरातील राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता अजितदादांच्या विचाराने घडलेला आहे. पवारसाहेबांचा राजकारणातील मुत्सद्दीपणा आणि दादांची निर्भिड कार्यप्रणाली यापासून प्रेरणा घेऊन कार्यकर्त्यांना काम कारायला बळ मिळते. कठीण काळात जय पराजय होत असला तरी पवारसाहेबांच्या नेतृवाखाली शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात आता मोठे यश आले आहे. शहरातील राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला यापासून जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे, अशीही भावना कार्यकर्ते संदीप काटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
गेल्या पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारकडून पिंपरी-चिंचवडसाठी अपेक्षीत निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे शहरातील विकास कामे म्हणावी त्या गतीने पूर्ण होताना दिसत नाहीत. आता मंत्रीमंडळ स्थापन होत असताना अजितदादांना उपमुख्यमंत्री पद मिळावे एवढीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आपेक्षा आहे. यानंतर शहरातील प्रलंबित कामे गतीने मार्गी लागतील. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने नागरिकांवर पाणी कपात लागू केली आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे भिजतघोंगडे आहे. नागरिकांना नाहक शास्ती कर भरावा लागत आहे. अजितदादा सक्रिय झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडचा खुंटलेला विकास पुन्हा गतीमान होईल, याची मला खात्री आहे. त्यासाठी अजितदादांना राज्यात उपमुख्यमंत्री पद मिळणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा कार्यकर्ते संदीप काटे यांनी पवारसाहेबांकडे प्रसिध्दीपत्रकातून व्यक्त केली आहे.
राज्यात सत्तांतर होत असताना अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दर्षविला होता. दोन दिवसानंतर न्यायालयाने जो निकाल दिला. त्यानंतर अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, त्यांना पक्षात परतण्याची विनंती देखील करण्यात आली होती. दादांनी कार्यकर्त्यांच्या विनंतीचा मान राखून पक्षात परतल्याने खचलेल्या कार्यकर्त्याला उभारी मिळाली आहे. ते पक्षात परतल्याने मनापासून समाधान होत आहे, असेही काटे यांनी म्हटले आहे.


















