न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०१९) :- महाराष्ट्रात स्थापन होत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर आज पिंपरी येथील डाॅ. बाबसाहेब आंबेडकर चौकात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस च्या युवा कार्यकर्त्यांनी एकत्रीत जल्लोष साजरा केला.
आज या तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी पिंपरी चौकातील नागरिकांना पेढे भरवीत व आनंद व्यक्त करत जोरदार घोषणेबाजी केली, शिवसेनेचा विजय असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, लोकशाहीचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजां चा विजय असो, डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा फुलेंचा विजय असो, सोनियाजी जिंदाबाद, शरद पवार जिंदाबाद, अजितदादा जिंदाबाद, उध्दव साहेब जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. नागरिकानीही यावेळी कार्यकर्त्यांना प्रतिसाद देत समाधान व आनंद व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते इम्रानभाई शेख, कार्यालय सचिव जेष्ठ नेते रामदास मोरे ,धनाजी तांबे ,मुवाज मुजावर ,जुनेद बादशहा, हुमेद शेख, संतोष भालेराव,सैफ शेख,राशीद सैय्यद,जावेद शेख आदि उपस्थित होते.
युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नासिर चौधरी, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, एन एस यु आय चे शहरअध्यक्ष डाॅ. वसीम इनामदार, माजी अध्यक्ष निखिल भोईर, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सौरभ शिंदे, अनिल सोनकांबळे,अक्षय उपरे, युनूस बागवान, सैज्जाद शेख.
शिवसेने चे रुपेश कदम ज़िल्हा समन्वयक, जितेंद्र ननावरे,सुरज लांडगे ज़िल्हा युवा अधिकारी, कुणाल जगनाडे विधानसभा प्रमुक युवासेना, अभिजीत गोफन विधानसभा प्रमुख हे सर्व उपस्थित होते.












