- आ. महेश लांडगे या विकासपुरुषाचा भव्य नागरी सत्कार करण्याचा योग माझ्या वाढदिनी आला – नगरसेवक राजेंद्र लांडगे
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०१९) :- भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शहर सुधारणा समितीचे सभापती राजेंद्र लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरीतील प्रभाग क्रमांक सहा, भगत वस्ती परिसरातील गणेश मंदिर या ठिकाणी उद्या शुक्रवारी (दि. २९) रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे हे जवळपास लाखांच्या मताधिक्क्याने विजय मिळवीत दुसऱ्यांदा आमदारपदी विराजमान झाले आहेत. त्यानिमित्ताने त्यांचा भव्य नागरी सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे. त्याशिवाय विविध कार्यक्रमांची रेलचेलही असणार आहे.
नगरसेवक राजेंद्र लांडगे म्हणाले की, आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवडसह भोसरी मतदारसंघातील अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे भोसरी मतदारसंघातील विकासपुरुष अशी नवीन ओळख आमदार महेश लांडगे यांची झाली आहे. अनेक नव-नवीन प्रकल्प राबवित असतानाच मतदारसंघातील गावकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रकल्पांची निर्मिती त्यांनी केली. त्यांच्या अडी-अडचणी मार्गी लावल्या. मतदारसंघातील शेवटच्या नागरिकांपर्यंत विकास नेणारा माणूस म्हणून आज त्यांची भोसरी मतदारसंघात ओळख आहे. प्रभाग क्रमांक सहामधील अनेक कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. रस्त्याची असोत की इतर, प्रभागाला निधी देण्यास ते कायम तत्पर असतात. जनतेच्या पुण्याईवरच ते दुसऱ्यांदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. अशा या विकासपुरुषाचा भव्य नागरी सत्कार करण्याचा योग माझ्या वाढदिनी आला आहे. हीच प्रतिमा ते अखेरपर्यंत जपतील.
या दरम्यान उद्या (दि. २९) रोजी पहाटे ५.०० वा. भगतवस्ती परिसरातील श्री. भैरवनाथ मंदिरात अभिषेक पूजा होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.०० वाजता मधुमेह मुक्त भारत अभियान अंतर्गत मोफत रक्तशर्करा तपासणी महाशिबीर, सकाळी ११. ०० वा. स्नेहवन आश्रमात अन्नदान वाटप, दुपारी १२. ०० वा. प्रभाग क्र. ६ मधील सफाई महिला कर्मचाऱ्यांना साड्या वाटप, दु. २.०० वा. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मधुमेह संशोधक डॉ. रविंद्र नांदेडकर यांचे व्याखान, सायं. ६.०० वा. सर्व महिलांसाठी ‘न्यु होम मिनिस्टर (खेळ पैठणीचा) हा विषेश कार्यक्रम होणार असून, त्यांनतर सायं. ७. ३० वा. आमदार महेशदादा लांडगे यांचा भव्य नागरी सत्काराचा कार्यक्रम असून, त्यानंतर सायं. ८. ०० वा. अभिष्टचिंतन सोहळा रंगणार आहे.
या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिध्द निवेदक क्रांती (नाना) मळेगावकर करणार आहेत, अशी माहिती नगरसेवक राजेंद्र लांडगे युवा मंच, नाथसाहेब मित्र मंडळ या आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.















