न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागच्या वतीने पिंपळे सौदागर प्रभाग क्र. २८ मध्ये गुरुवारी (दि. २८) रोजी अनधिकृत पत्राशेड निष्कासन कारवाई व स्मार्ट सिटी अंतर्गत गोविंद गार्डन जवळ कारवाई करण्यात आली.
या कारवाईत गोविंद गार्डन परिसरातील ५ पत्राशेडवर निष्कासन कारवाई करण्यात आली. तसेच, ४१ पत्राशेड धारकांनी स्वतःहून अनधिकृत पत्राशेड काढून घेतले आहे. पत्राशेड बांधकाम अंदाजे क्षेत्रफळ ६०० चौ. फुटाच्या पत्राशेडवर कारवाई करणेत आली व अंदाजे क्षेत्रफळ ५००० चौ. फुटाचे पत्राशेड संबंधित धारकांनी स्वतःहून काढून घेतले. एकूण अंदाजे क्षेत्रफळ ५६०० चौ. फुटाच्या ४६ पत्राशेडवर कारवाई पूर्ण झाली.
ही कारवाई कार्यकारी अभियंता बांधकाम परवानगी व अनधित बांधकाम नियंत्रण विभाग यांच्या पथकाने केली. या कारवाईत १ जे. सी. बी., १ ट्रक, तसेच १० मजुर, यांच्या सहाय्याने ही कारवाई करणेत आली. सदर कारवाई मनपा अधिकारी व कर्मचारी तसेच १० पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आली. कारवाई शांततेत पार पडली. अशी माहिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता ‘ ड ‘ प्रभाग बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधम नियंत्रण विभागाने दिली आहे.















