न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०१९) :- आमदार महेश लांडगे यांनी त्यांचा वाढदिवस दिव्यांग व्यक्तींना समर्पित केला. त्या अनुषंगाने आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्विकृत नगरसेविका साधना सचिन तापकीर व युवा नेते सचिन श्रीधर तापकीर यांनी इतरत्र होणारा जाहिरातबाजी व फ्लेक्सबाजीच्या अनाठायी खर्चाला आळा घालीत, ‘एक हात मदती’ चा म्हणून माणूसकीचे एक उत्तम उदाहरण सादर केले. त्यांनी चऱ्होली परिसरातील चोविसावाडी, बुर्डे वस्ती, चऱ्होली गावठाण व तसेच डुडूळगाव येथील महापालिकेच्या शाळांना आवश्यक साधन सामुग्रीचे वाटप केले.
यावेळी माजी महापौर नितीन काळजे, स्वी. नगरसेविका साधना तापकीर, सचिन तापकीर, चऱ्होली बु. परिसरातील समस्त ग्रामस्थ आणि महेशदादा फ्रेंडस् सर्कलचे कार्यकर्ते व आदी उपस्थित होते.
चऱ्होली गावातील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कलर प्रिंटर, लेझीम डंबेल्स, झेंडे इत्यादी कवायतीचे साहित्य, तसेच बुर्डे वस्तीतील महापालिकेच्या शाळेत संगणक, चोविसावाडीतील महापालिकेच्या शाळेत प्रोजेक्टर एलईडी टीव्ही, ई लर्निंग सुविधायुक्त साधने व डुडुळगावातील महापालिकेच्या शाळेत गोदरेज कपाट तसेच कृष्णधवल प्रिंटर आणि योगासनाचे मॅटचे मान्यवरांचे वाटप करण्यात आले.















