- याशिवाय शिवसेनेकडून शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई
- राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ,
- कॉंग्रेसकडून कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांनीही घेतली मंत्रीपदाची शपथ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०१९) :- मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की.. असं म्हणत महाराष्ट्र राज्याच्या २९ व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ आज उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्क मैदानावर घेतली.
शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी ही शपथ उद्धव ठाकरेंना दिली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंनी सरकार स्थापन केलं. त्यानंतर जमलेल्या सगळ्या उपस्थितांना उद्धव ठाकरेंनी दंडवतही घातला.
यावेळी शिवसेनेकडून शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ, कॉंग्रेसकडून कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी शिवसैनिक, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.















