न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २२०१९) :- शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय काँग्रेस पक्षाने १६९ आमदारांच्या सहकार्याने उद्धव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठराव बहुमताने पारित केला.
यावेळी चिखलीतील साने चौक येथे आज शनिवारी (दि. ३०) रोजी तिन्ही पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी एकत्र येत पेढे व फटाके फोडुन जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसेना हिंदू ह्रुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले. यावेळी धनंजय आल्हाट, रावसाहेब थोरात, दत्ता साने, काशिनाथ जगताप, अनिल सोमवंशी, युवराज कोकाटे, सतीश डिसले, संजय गाढवे, लोकरे, हिंगे व आदी उपस्थित होते.
यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणांनी चिखली परिसर दुमदुमून गेला होता.












