न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ डिसेंबर २०१९) :- चिखली येथील नागेश्वर माध्यमिक विद्यालय, पाटीलनगर शाळेतील विद्याथ्यांची शैक्षणिक सहल बाहेर गावी जाणार असल्याने त्यांना प्रथमोपचार औषधांचीची गरज होती.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी या संदर्भातील औषधांच्या मागणीचे पत्र ‘ फ ‘ क्षेत्रीय कार्यालयाचे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांना दिले होते. याबाबत यादव यांनी विद्यार्थ्यांची व शिक्षकांची ही गैरसोय लक्षात घेऊन तात्काळ या औषधांची पूर्तता करून दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना सहलीसाठी प्रथोपचाराची मदत झाली. दिनेश यादव यांनी सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


















