न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ डिसेंबर २०१९) :- घरात घुसून महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला नातेवाईकांनी चांगलाच चोप दिला. ही घटना पिंपरी येथे घडली. हरि सोमनाथ गायकवाड (वय ४०, रा. बौद्धनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत २८ वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. ३) रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा वेळोवेळी फिर्यादी महिलेचा पाठलाग करीत होता. शिट्टी वाजवून अश्लिल शेरेबाजी करीत असे. घराची कडी वाजविणे, फिर्यादी कपडे बदलत असताना खिडकीतून डोकावून पाहणे, अशा प्रकारे त्रास देत होता. मंगळवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास आरोपी पीडित महिलेच्या घरात घुसला व त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. यावेळी महिलेने आरडाओरड केल्याने नातेवाईक जमा झाले.
नातेवाईकांनी आणि पीडितेनी आरोपी गायकवाड यांना चोप दिला. यावेळी आरोपी हा नातेवाईकांना चावला. तसेच आपल्याला झालेल्या मारहाणीबाबत त्याने पिंपरी पोलीस ठाण्यात दहा ते बारा जणांच्या विरोधात मारहाणीची फिर्याद दिली आहे.












