न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ डिसेंबर २०१९) :- मोशी परिसरातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक तसेच सिल्वर ग्रुपचे चेअरमन संतोष सिताराम बारणे यांना सामाजिक कार्यासाठी श्रीलंकेतील ओपन युनिव्हर्सिटी कोलंबो यांच्याकडून कॉम्प्लीमेंटरी मेडीसीन्स या विषयात डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
दहावी पास असलेल्या मात्र सामाजिक कार्याचा वसा हाती घेऊन बांधकाम व्यावसायिक संतोष बारणे यांनी कार्याचा शुभारंभ केला आहे. समाजाचे काही देणं लागत या उद्देशाने त्यांनी अनेक उपक्रम, मुलांच्या शिक्षणासाठी पालकत्व, क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी, अनाथ आश्रमांना मदत यासोबतच पर्यावरणाचे संवर्धन यासाठीही पुढाकार घेऊन उपक्रम केले आहेत. सांगली कोल्हापूर मधील दुष्काळग्रस्तांना तत्काळ मदत पुरवण्याचे काम बारणे यांनी केले आहे.
त्यांच्या या कार्याची सर्व स्तरातून चर्चा झाली आहे. बांधकाम व्यावसायिक संतोष बारणे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल अनेक संस्था, संघटना तसेच विद्यापीठाच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. आतापर्यंत अनेक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे . सातासमुद्रापार त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना कॉम्प्लीमेंटरी मेडीसीन्स या विषयात डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.












