न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ डिसेंबर २०१९) :- शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परळमधील बीआयटी चाळीला भेट दिली. बीआयटी चाळ येथील एका इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अनेक वर्षे वास्तव्यास होते. या घरालाही त्यांनी भेट दिली.
यावेळी त्यांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६३ वा महापरिनिर्माण दिन आहे. यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.















