न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या काळभोरनगरमधील माध्यमिक शाळेत मध्यान्ह भोजनात सोमवारी (दि. ९) रोजी उंदराच्या लेंढ्या आढळल्या आहेत. याबाबत आयुक्तांकडे तक्रार करणार असून, तात्काळ कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती नगरसेविका वैशाली काळभोर यांनी दिली.
सोमवारी दुपारच्या जेवणाला खिचडी देण्यात आली होती. त्यामध्ये उंदीराच्या लेंढ्या आढळून आल्या आहेत. या शाळेमध्ये शालेय पोषण आहार देण्यासाठी सुरुची या संस्थेने मागणी केली होती. मात्र ही संस्था अपात्र ठरली होती. या संस्थेने पुन्हा मोरया गोसावी महिला बचत गटाची स्थापना करून हे काम मिळविले आहे. काळभोरनगरमधील महापालिकेच्या शाळेत आज ८० विद्यार्थी हजर होते. विद्यार्थ्यांना खिचडी देण्याआधी शिक्षकांनी घेतली होती. मात्र खाताना त्यामध्ये लेंढ्या सापडल्या असल्याची माहिती मुख्याध्यापिका सुरेखा रोटे यांनी दिली.
याप्रकरणी चौकशी करून संबधित बचतगटांवर कारवाई करू, तसेच विद्यार्थ्यांना चांगला आहार देण्यासाठी प्रयत्न करू.
ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग…















