न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ डिसेंबर २०१९) :- विरूद्ध दिशेने आलेल्या रिक्षाचालकाने बसचा रस्ता अडविला. वाद मिटविण्यासाठी आलेल्या बसच्या वाहकालाही शिवीगाळ करीत रिक्षाचालकाने त्याला फरपटत नेले. यात पायाला खरचटून वाहक जखमी झाला.
मोशी येथे सोमवारी (दि. ९) रोजी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. श्रीकांत मालीस गुरख (वय ३८, रा. कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली) असे जखमी वाहकाचे नाव आहे. याप्रकरणी वाहक गुरव यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहक गुरव व चालक अशोक दिनकर काळकुटे (वय ३३, रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) हे दोघेही नाशिक-सांगली बस घेऊन जात होते. त्यावेळी मोशी येथे विरुद्ध दिशेने एक रिक्षा आली. पुरेसा रस्ता असतानाही रिक्षाचालकाने रिक्षा बससमोर थांबविली. त्यामुळे बसचालक काळकुटे रिक्षाचालकास रिक्षा निट चालव, रस्ता मोकळा आहे, तेथून जा. त्यानंतर अनोळखी रिक्षाचालकाने बसचालक काळकुट यांना शिवीगाळ केली.
त्यामुळे बसचे वाहक गुख त्यांच्यातील वाद मिटविण्यासाठी बसच्या खाली उतरून रिक्षाजवळ गेले. रिक्षाचालकाला समजावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळी त्याने वाहक गुरव यांनाही शिवीगाळ केली. तसेच वाहक गुरव रिक्षावर हात ठेवून उभे असताना त्याकडे दुर्लक्ष करून रिक्षाचालकाने त्याची रिक्षा सुरू करून घेऊन जात होता. त्यामुळे गुरव यांचा हात रिक्षात अडकून ते फरपटत गेले. हा प्रकार पाहून बसमधील प्रवासी तसेच काही नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर रिक्षाचालक थांबला. फरपटत गेल्याने पायाला जखम झाली. त्यानंतर बसचालक काळकुटे, वाहक गुरव यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.















