न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०१९) :- सर्वत्र मंदीचे सावट असताना घर खरेदीकडे ग्राहकांचा फारसा कल नाही असे चित्र आहे. अशा वेळी बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य यशदा रियालिटी कंपनीने स्प्लेंडिड पार्क या गृहप्रकल्पाने हा समज चुकीचा ठरवला आहे. मोशी – आळंदी रोडवर, डुडुळगाव येथे वसलेल्या या प्रकल्पाला शुभारंभाच्या दिवशीच ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
पहिल्या दिवशी फेजमधील ८० टक्के सदनिका विक्री झाल्याची माहिती कंपनीच्या प्रवर्तकांनी दिली. स्प्लेंडिड पार्क प्रकल्प हा पुणे आणि पिंपरी – चिंचवडच्या मध्यभागी असलेल्या लोकेशनच्या ठिकाणी आहे. सदनिका बुकिंग करणाऱ्या ग्राहकांनी ११ जानेवारीपर्यंत रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण केल्यास प्रत्येकाला आकर्षक भेटवस्तू मिळणार आहे.
यामध्ये ३२ इंची एलईडी टीव्ही आणि लकी ड्रॉ मध्ये भाग घेऊन कार, बाईक तसेच अनेक मौल्यवान बक्षिसे जिंकण्याची सवर्णसंधी देण्यात आली आहे. या प्रकल्पाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी यशदा रियालिटी कंपनीच्या संकेतस्थळाला भेट द्या, असे आवाहन यशदा रिअल्टीचे प्रमुख वसंत काटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.















