- स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांची झोनिपु विभागाकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने काळेवाडी फाटा ते देहू फाटा, आळंदी बी. आर. टी. रस्ता रुंदीकरणासाठी चिखलीतील कुदळवाडी परिसरात रस्त्यासाठी बाधित नागरिकांची जागा संपादित केली आहे. त्यामुळे बाधित नागरिक उघड्यावर आले आहेत.
कुदळवाडीतील या बाधित नागरिकांना घरकुल योजनेमध्ये समाविष्ट करीत त्यांना घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी ‘ फ ‘ प्रभाग कार्यालयाचे स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाचे अधिकारी चंद्रकांत इंदलकर यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले.
यावेळी इंदलकर यांनी पिपंरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तसेच भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्याशी चर्चा करुन, महापालिकेच्या वतीने कुदळवाडीतील बीआरटीस रस्ता बाधित नागरिकांना घरकुल मिळवून देण्यासाठी त्वरित पाउलं उचलण्यात येतील, असे आश्वासन यावेळी दिनेश यादव यांना दिले. यादव यांनी या आधीही अशीच मागणी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.












