न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०१९) :- डेटिंग साईटवर तरुणीला शोधणे एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. संबंधित व्यक्तीची तब्बल ६५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे.
जयंत विश्वनाथ ढाळे (४०) असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते एका नामांकित कंपनीत काम करतात. जंयत ढाळे यांची पहिल्या वेळी ४२ लाख तर दुसऱ्या वेळेस २३ लाख रुपये अशी दोन वेळा फसवणूक करण्यात आली. पिंपरी-चिंचवड सायबर क्राइम याप्रकरणी अधिक तपास करत आहे.












