- मच्छिंद्र तापकीर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष मच्छिंद्र तापकीर यांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०१९) :- कै. लक्ष्मीबाई तापकीर यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मच्छिंद्र तापकीर सोशल फाउंडेशनच्या वतीने शुक्रवारी (दि. १३ डिसेंबर) रोजी भक्तीसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
काळेवाडी तापकीरनगर येथील कै. लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत सदर कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात ईटीव्ही मराठीवरील गौरव महाराष्ट्राचा व झी युवा संगीत सम्राट पर्व २ फेम गायिका अश्विनी मिठे, गायिका आरती मिठे तसेच बालकलाकार गायक चैतन्य यांच्या सुमधुर स्वरात हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम पार पडणार आहे.
सदर कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा रहाटणी काळेवाडी परिसरातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजन माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर आणि युवा नेते सागर तापकीर यांनी केले आहे.












