न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०१९) :- मयत संगीता या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीवर काम करत होत्या. त्यांनी राहत्या घरी खांबाला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला.
ही घटना सकाळी उघडकीस आली. संगीता यांच्या मुलाने त्यांना तात्काळ उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
ही घटना आज, मंगळवारी (दि. १०) रोजी सकाळी पिंपरीमधील रमाबाईनगर येथे उघडकीस आली आहे. संगीता बाळू गाडे (वय ४०, रा. रमाबाई नगर, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.












