न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०१९) :- पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण रावेत येथील रमाबाईनगर परिसरातील रहिवाशांना दमदाटी करुन घरे रिकामी करण्यास सांगत आहेत. प्राधिकरण प्रशासनाच्या या दडपशाहीचा विरोध करण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच, प्राधिकरणाच्या कार्यालयावर येथील रहिवाश्यांनी बुधवारी (दि. १२) मोर्चा काढला.
त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजीवन कांबळे, बाळासाहेब भालेराव, दिनकर ओव्हाळ, विजय ओव्हाळ, अनिता सावळे यांनी मोर्चात सहभाग घेतला.


















