न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०१९) :- चिखली परिसरात गुरुवारी (दि. १२) पहाटे म्हेत्रे वस्ती, चिखली येथील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हेत्रे वस्ती चिखली येथे आयसीआयसीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे. पहाटे दोन वाजताच सुमारास एक चोरटा पैसे काढण्याच्या निमित्ताने एटीएम सेंटरमध्ये येऊन पाहणी करून गेला. त्यानंतर पहाटे चार वाजताच्या सुमारास तीन चोरटे एटीएम सेंटरमध्ये आले. त्यांनी आतील सीसीटीव्ही कॅमेरा बाहेरील रोडच्या दिशेला फिरवला. त्यानंतर एटीएम सेंटरमधील दर्शनी भागाची तोडफोड केली. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. हे चोरटे स्थानिक असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.












