न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने हुतात्मा बाबू गेनू यांच्या शहिददिनी त्यांचे प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, नगरसचिव उल्हास जगताप, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.












