- गडावरून सरसकट शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता? …
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०१९) :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोणावळा जवळील कार्ला येथील एकविरा देवीचं दर्शन घेतलं आहे. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि चिरंजीव तसंच आमदार आदित्य ठाकरेही उपस्थित होते.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच एकविरा देवीच्या दर्शनाला पोहोचले. एकविरा देवीचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे शिवनेरी गडावर जाणार आहेत. किल्ले शिवनेरीवरून उद्धव ठाकरे सरसकट शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.












