न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०१९) :- नेहरुनगर येथे एका इमारतीचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी थापा काम करीत होते. त्यांनी लिफ्टच्या डक्टवर लोखंडी शिडी आडवी लावली. त्या शिडीला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
आज गुरुवारी सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. भीम थापा (वय ३२, रा. नेहरूनगर, पिंपरी), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.












