न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०१९) :- चिखली परिसरात गुरुवारी (दि. १२) पहाटे म्हेत्रे वस्ती, चिखली येथील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फोडल्याचा प्रकार उघडकीस आला होता. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते. तीन चोरट्यांना चिखली पोलिसांनी केवळ पाच तासात शोधून अटक केली आहे.
विष्णू प्रसाद चौधरी (वय २६, रा. मोरेवस्ती, चिखली. मूळ रा. नेपाळ), श्याम बाबूराम राणा (वय १९, रा. मोरेवस्ती चिखली. मूळ रा. उत्तर प्रदेश), राजेंद्रकुमार जोगिराम राणा (वय २६, रा. मोरेवस्ती, चिखली. मूळ रा. उत्तर प्रदेश), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.












