न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०१९) :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चऱ्होली बु. ।। येथील राष्ट्रवादी विचारमंच च्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चऱ्होलीतील मुस्लिम समाज दफणभूमी परिसरात मान्यवरांच्या हस्ते ८० झाडांचे रोपणकरण्यात आले.
समाज बांधवाच्या एकोप्यासाठी आणि दफणभूमी/स्मशानभूमी विषयी लोकांमधे असणारी अंधश्रद्धेची भावना दूर व्हावी, असा संदेश समाजात जावा हा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता, असं आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलं.
या प्रसंगी चऱ्होलीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कट्टर समर्थक, पवार साहेबांवर प्रेम करणारे इतर पक्षीय कार्यकर्ते तसेच, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी गुलाबभाई मुलाणी आदी उपस्थित होते, अशी माहिती राष्ट्रवादी विचार मंचच्या वतीने देण्यात आली.












