न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०१९) :- जुन्या भांडणाचा राग मनात धरून, पंधरा वर्षीय मुलीचा गळा दाबून खून करण्यात आला. ही घटना दापोडी येथे घडली. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार विजय बबन चव्हाण वय ५५, रा. सेनापती चौक, बॉम्बे कॉलनी, दापोडी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा गुरुवारी सकाळी सात वाजता फिर्यादीच्या घराजवळ गेला. शिवीगाळ करीत म्हणाला की ‘आज तुला पिक्चर दाखवितो’. त्यावर फिर्यादी म्हणाल्या, ‘तू काय मला पिक्चर दाखवितो, मीच तुला ट्रेलर दाखविते, माझ्या मुलींना हात तर लावून बघ’ असे बोलल्याच्या रागातून आरोपीने फिर्यादीच्या मुलीच्या तोंडावर मारहाण करून गळा दाबून खून केला. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.












