- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरीत गौप्यस्फोट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. १४) रोजी माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा नियोजित दौरा होता. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांशी संवाद साधला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २०२२ मध्ये फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग ठेवायचे की वार्ड पद्धतीने निवडणूक घ्यायची, असे अजित पवार यांनी नगरसेवकांना विचारले. त्यावर सर्व आजी-माजी नगरसेवकांनी द्विसदस्यीय पद्धतीने (वॉर्ड) घेण्याची मागणी केली.
मुंबई महापालिका सोडून द्विसदस्यीय पद्धतीने (वॉर्ड) घेण्याचा विचार आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रित निर्णय घेतील, असे अजित पवार यांनी सांगितले.