- आर. के. एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलमध्ये विहारधामचे लोकार्पण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०१९) :- आळंदी-भोसरी रस्त्यावरील चऱ्होली फाटा, अलंकापूरम नगरीजवळ आर. के. एल. स्कूलमध्ये विहारधामचा लोकार्पणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
जैन साधू पायी विहार करीत असतात. विश्रांतवाडी ते आळंदी या मार्गावर साधूंसाठी विश्रांतीसाठी विहारधामची अत्यंत गरज होती. ही निकड अखिल भारतीय जैन कॉन्फरन्सचे मानवसेवा समितीचे अध्यक्ष उद्योजक रमणलाल लुंकड यांनी स्वखर्चातून ही सेवा उपलब्ध करून दिली आहे.
यावेळी आचार्यसम्राट राष्ट्रसंत ध्यानयोगी डॉ. शिवमुनीजी महाराज, युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज आदी ठाणा ८ या साधूंच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला. या वेळी जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष सागर सांकला, जैन श्रावक संघाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रकल्पाचे प्रमुख जेष्ठ समाजसेवक रमणलाल लुंकड म्हणाले की, माझ्या आयुष्याची सुरुवात औंध शहरात झाली. साधू-संताची कृपा आणि सानिध्य यामुळे माझ्या आयुष्याची भरभराट झाली. व्यवसायातून मिळालेले धन समाजसेवेसाठी वापरले. या माध्यमातून डायलेसीस सेवा, विहारधाम यासारखे आदी समाजपयोगी प्रकल्प राबविले जात आहेत. यापुढेही समाजाच्या उन्नतीसाठी जमेल ते सहकार्य करण्यासाठी आर. के. लुंकड परिवार सदैव तत्पर असेल. उपस्थित इतर मान्यवरांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वागत आर. के. एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलचे संचालक रवींद्र लुंकड यांनी तर, उद्योजक राजेंद्र लुंकड यांनी आभार मानले.















