न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात भटकी, मोकाट जनावरांचा (गाय, म्हैस, घोडा, गाढव इ.) वावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुख्यावे करून अंतर्गत जुना पुणे मुबई महामार्ग, अंतर्गत रस्ते, चौक, बाजारपेठा उद्यान परीसर इ. ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपद्रव होत आहे.
नजीकच्या काळात पशुवैद्यकीय विभागाद्वारे जनावरे पकडण्याची मोहिम राबवून सदर जनावरे ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात येणार आहे. तरी याद्वारे आवाहन करणेत येते की, जनावरे मालकांनी आपली जनावरे बंदिस्त करून ठेवावी व शहरात सार्वजनिक ठिकाणी त्यांचा वावर होऊ नये, याची दक्षता घ्यावी, असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.












