न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०१९) :- फोर्स मोटर्सच्या ट्रॅव्हलर मिनी बस १३,१४,१५,२० आणि २६ सीटर बसनंतर आता ट्रॅव्हलरची ३३ सीटर बस बाजारात दाखल करण्यात आली. या ३३ सीटर ट्रॅव्हलर मिनीबसचे नुकतेच लॉंचिंग करण्यात आले. या कार्यक्रमाला पुण्यातील नामवंत ट्रान्सपोर्टर उपस्थित होते.
या ३३ सीटर ट्रॅव्हलर बसची वैशिष्ट्ये म्हणजे ही बस आरामदायी मोनोकॉक बॉडी, हायड्रोलिक यूनी बुस्टर डिस्क ब्रेक, ६.८ मिटर टर्निंग रेडिअस, उत्तम मायलेज प्रदान करण्यात आले आहे.
शाळा, कंपन्या आणि सामान्य प्रवाश्यांना या बसचा फायदा होणार आहे. बस लाँचिंगच्या कार्यक्रमास पुण्यातील ट्रान्सपोर्टर तसेच काही चालक देखील उपस्थित होते. यावेळी तज्ज्ञांकडून ट्रान्स्पोटर्स आणि चालकांना गाडीविषयी माहिती देण्यात आली. येत्या चार महिन्यांमध्ये ५० बस विक्रीचे उद्दिष्ट सिद्धार्थ मोटर्सने ठेवले आहे,अशी माहिती सिद्धार्थ मोटर्सचे संचालक सिद्धार्थ खिंवसरा यांनी दिली.
फोर्स मोटर्सचे प्रॉडक्ट हेड विनोद गुलाटी म्हणाले, “या प्रॉडक्टचे उत्पादन सुरू झाल्यावर भविष्यात फोर्स मोटर्सच्या ३३ सीटर बसचा बाजारामध्ये वाटा सुधारण्यासाठी आणि उत्पादन वाढविण्याच्या मोठ्या योजना आहेत.












