न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०१९) :- लग्रासाठी तरुणीचे अपहरण केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरी येथे सोमवारी (दि. १६) सकाळी घडली. अमोल अरविंद भिलारे (२७, रा. वायसीएम रुग्णालयासमोर), हर्षल जिरेकर (३०, रा. पिंपरी) आणि त्यांचा एक अनोळखी मित्र (नाव, पत्ता माहिती नाही) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी २७ वर्षीय तरुणीने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमोल भिलारे याला अटक केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी भिलारे यांच्यात गेल्या सहा वर्षापासून प्रेमसंबंध आहेत.
सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादीसोबत लग्न करण्यासाठी मोटारीतून अपहरण केले. मात्र, तरुणीने त्यास जोरदार विरोध केल्याने चालत्या मोटारीतून तिला ढकलून देण्यात आले. यामध्ये तरुणीला मोठ्या प्रमाणात मार लागला. पुढील तपास भोसरी पोलिस करीत आहेत.












