न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०१९) :- २००९ ते १३ डिसेंबर २०१९ या कालावधीमध्ये आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांची मुलगी आशा हिला माहेरवरून पैसे आणले नाहीत, तसेच मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून वेळोवेळी शिवीगाळ करीत तिचा मानसिक व शारीरिक छळ केला.
या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली. ही घटना पिंपरी आणि इंदापूर येथे घडली. याबाबत पती भीमराव लक्ष्मण जोगदंड (वय ३४), सासरा लक्ष्मण जोगदंड (वय ५५), दीर बुवा जोगदंड, दीर नागेश जोगदंड, चुलत दीर (नाव, पत्ता माहित नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
आशा भीमराव जोगदंड (वय २५, रा. वाघेरे कॉलनी, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत ५५ वर्षीय मृत आशाच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.















