न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने आपली वेबसाईट नागरिकांच्या सेवेत दाखल केली. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या हस्ते बुधवारी (दि. १८) वेबसाईटचे लॉंचिंग करण्यात आले. pcpc.gov.in या वेबसाईटच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड पोलीस नागरिकांपर्यंत पोहोचणार आहेत.
त्याचबरोबर नागरिकांशी संवाद वाढविण्यासाठी १६ जुलै २०१९ रोजी पिंपरी चिंचवड पोलिसांनी ट्विटर अकाउंट सुरू केले. Pimpri Chinchwad Police असे ट्विटर अकाउंटच्या प्रोफाइलचे नाव आहे. तर @PCcityPolice या नावाने ट्विटर अकाऊंट सुरु करण्यात आले आहे.
यानंतर, पोलीस आयुक्तालयाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी. तसेच नागरिकांच्या समस्या, पोलिसांचे नवीन उपक्रम, गुन्हेगारांची माहिती यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी आपली स्वतंत्र वेबसाईट सुरू केली.















