न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०१९) :- तिकोना किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेला तरुण हेडफोन उचलत असताना खोल दरीत पडला. हार्दिक माळी असे या तरुणाचे नाव आहे. हार्दिक आज सकाळी काही मित्रांसह तिकोना किल्ल्यावर फिरायला गेला होता.
किल्ल्यावर असताना हार्दिकचा हेडफोन खाली पडला. खाली वाकून हेडफोन उचलत असताना हार्दिकचा तोल गेला व तो २५० फूट खोल दरीत पडला. हार्दिक तळेगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता. वरण तळ्याच्या मागील बुरुजावरुन तो २५० फूट खोल दरीत पडला.
हेडफोन उचलत असताना तोल जाऊन थेट खाली पडला असे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सांगितले. या दुर्देवी घटनेत हार्दिकचा मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला. शीवदुर्ग मित्र लोणावळा टीम मदतीसाठी दाखल झाली. त्यांनी हार्दिकचा मृतदेह शोधला.















