न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०१९) :- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने ६३ वे अधिवेशन व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जानेवारी २०२० मध्ये बालेवाडी येथे होणार आहेत.
त्यासाठी पिंपरी चिंचवड परिसरातील कुस्तीगीरांची निवड चाचणी स्पर्धा मंगळवार (दि. २४) रोजी रहाटणी येथील थोपटे लॉन्स येथे होणार असल्याची माहिती निवड स्पर्धेचे आयोजक व ड प्रभाग स्वीकृत सदस्य संदीप भानुदास नखाते आणि पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस संतोष माचुत्रे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.
मंगळवारी (दि. २४) होणा-या या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दुपारी ३ वाजता, तर बक्षीस समारंभ रात्री ३ वाजता होणार आहे. कुस्तीगीरांची वजने मंगळवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत घेतली जातील. स्पर्धा कुमार गट, माती गट व गादी गटात होईल. कुमार वजनी गट ४५, ४८, ५१, ५५, ६०, ६५, ७१, ८०, ९२, ११० तर महाराष्ट्र केसरी वजनी गट ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७, १२५ असा राहील.















