न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०१९) :- जगताप डेअरी चौकातील उजाणपुल येत्या महिनाभरात खुला होणार असून, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी फुटणार आहे. जानेवारीपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी सुरु करण्याचा प्रयत्न पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचा राहणार आहे. तुर्तास, या पुलाच्या कामामुळे वाहनचालकांना वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे इंधन आणि वेळेचा नाहक अपव्यवय होत असून, वाहतुकीची कोंडी वाढत आहे.
काळेवाडी ते औध रस्त्यावर पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने जगताप डेअरी चौकात उड्डाणपूल उभारला आहे. या रस्त्यावर प्राधिकरणाने तीन पूल उभारले असल्याने रावेत ते औंध अवघ्या पंधरा मिनिटांत जाणे शक्य होणार असल्याचे प्राधिकरण अधिकाऱ्यांचे मत आहे. दरम्यान पुण्याच्या दिशेने जाणारा रस्ता खुला केला आहे. त्यामुळे तेथे वाहनांची कोंडी होत नाही. मात्र, काळेवाडीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याचा पूल अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. परिणामी, औध वाहनचालकांना त्या पूलाचा वापर करता येत नाही. त्या वाहनांना जगताप डेअरी चौकापासून वाकडच्या रस्त्यावर वाहतूक वळवली आह . या रस्त्याची विविध कारणांनी दुरवस्था झाली आहे. वाहनचालकांचा बीआरटी चौकापासून वळसा घालावा लागत असल्याने वेळ आणि इंधन खर्ची पडत आहे.
पुलाच्या कामाची अंतिम मुदत फेब्रुवारीपर्यंत आहे. मात्र, त्यापूर्वीच कामे पूर्ण करून खुला करण्यात येणार आहे. पुलाचे काही तांत्रिक काम बाकी आहे. लाईटचे खांब, डांबरीकरण आणि पांढरे पट्टे यासारखी किरकोळ कामे बाकी आहेत. ती पूर्ण झाल्यानंतर लगेचच पूल खुला करण्यात आहे.
मुदतपूर्व काम करण्याचे नियोजन आहे. पुलाचे किरकोळ काम बाकी आहे. लवकरात लवकर तो पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत. या पुलामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे.
– प्रभाकर वसईकर, कार्यकारी अभियंता, पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण















