न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०१९) :- चारचाकी वाहन भाडेतत्वावर पाहिजे होते. त्यासाठी ऑनलाइन सर्च करून एका उपलब्ध झालेल्या मोबाइल क्रमांवर संपर्क साधून बँकेच्या खात्यातून ४३ हजार रुपये कपात एका लिंकवरून ट्रान्झेक्शन केले. त्यानंतर बकेच्या खात्यातून ४३ हजार रुपये कपात झाले. २८ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी १० ते सकाळी १० ते सव्वाअकराच्या दरम्यान हा फसवणुकीचा सव्वाअकराच्या दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार झाला.
पोलिसांनी प्रकार दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी संदीप परशुराम गायकवाड ( वय ३५, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गायकवाड यांना चारचाकी वाहन भाडेतत्त्वार पाहिजे होते. त्यासाठी त्यांनी ऑनलाइल सचिंग केले असता एका वेबसाईटवर त्यांना एक मोबाइल क्रमांक मिळाला.
त्यावर त्यांनी संपर्क साधला. त्यानंतर त्यांच्या मोबाइलवर एका अन्य मोबाइल क्रमांकावरून एक लिंक आली. त्या लिंकवर त्यांनी ट्रान्झेक्शन केले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ४३ हजार रुपये कपात झाले. ऑनलाइन फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, सांगवी पोलीस तपास करत आहेत.


















