न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०१९) :- अमृता फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली होती. ‘ठाकरे आडनाव असले तरी कोणी ठाकरे होत नाही. कुटुंब आणि सत्तेपलीकडे जाऊन लोकांसाठी प्रामाणिक काम करावे लागते,’ असे ट्विट अमृता यांनी केले होते. त्याचे तीव्र पडसाद राजकीय क्षेत्रात उमटत आहेत.
याबाबत शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांनी अमृता फडणवीस यांची फिरकी घेतली आहे. ‘ताई ठाकरे हे नाव म्हणजे प्रसिद्धी मिळवायचा सोपा मार्ग. तुमची तडफड आम्ही समजू शकतो. माणूस बेरोजगार असल्यावर मानसिक आजारातून देव लवकर बरे करो’ असे ट्विट दाखले यांनी अमृता फडणवीस यांना केले आहे.















