न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०१९) :- मॅगी बनवण्यास सांगून घरात एकटीच असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. पोलिसांत तक्रार दिल्यास तिला व तिच्या आईला जिवे मारण्याची धमकी दिली. हिंजवडी परिसरातील एका वस्तीवर मार्च २०१८ मध्ये ही घटना घडली. याप्रकरणी १५ वर्षीय पीडित मुलीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेश्वर ऊर्फ राजा नरहरी भुसावर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी घरी एकटीच असताना आरोपीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्या घरात गेला. मुलीला मॅगी बनवून देण्यास सांगितले व आतून दरवाजा बंद करून तिच्यावर अत्याचार केला. ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यास तिला व तिच्या आईला जिवे मारण्याची धमकी आरोपीने दिली
याबाबत पीडित तरुणीने मोशी येथील चैतन्य महिला मंडळाच्या संस्थापिका ज्योती पठाणीया यांना माहिती दिली. त्यांनी पोलिसांकडे पत्रव्यवहार केला. त्यानंतर हिंजवडी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला.












