न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसेंबर २०१९) :- आरोपी सुयश याने शादी डॉट कॉम या वधूवरसूचक संकेतस्थळावरून फिर्यादी महिलेशी ओळख केली. तसेच त्याने महिलेला ऑनलाइन फोटो पाठवून लग्नाची मागणी केली. आरोपी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश असल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेशी ओळख वाढवून तो महिलेच्या घरी आला.
महिलेचे एक लग्न झाले असून त्यांना एक मुलगी आहे. आरोपीने त्या मुलीसोबत फोटो काढले. हे फोटो काढण्यासाठी फिर्यादी महिलेने हरकत घेतली. मात्र तरीही आरोपीने ते फोटो डिलीट केले नाहीत. तसेच आरोपीने फिर्यादी महिलेशी घरात गैरवर्तन करत लग्नाची विचारणा केली.
लग्न न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी व अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीने फिर्यादी सोबत लग्न केल्याचा खोटा दावा केला. फिर्यादी महिलेने लग्नाची तारीख, वेळ व ठिकाण विचारले असता आरोपीने अश्लील मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग केला. ही घटना ११ सप्टेंबर ते २२ डिसेंबर २०१९ या कालावधीत घडली.
सुयश किसन मुळूक (रा. गंगापूर, नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी ३४ वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.















