न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०१९) :- शहरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी चार वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चुन वाटप केलेल्या डस्टबीनचा काहीही उपयोग झाला नाही. कचरा विलगीकरणाच्या उद्देशासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुन्हा डस्टबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गैरव्यवहार व चुकीच्या खरेदीप्रक्रियेचे जोरदार आरोप झाल्यामुळे आरोग्य विभागाने माघार घेत ही खरेदी रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, त्याला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम या योजनेअंतर्गत पिंपरी – चिंचवड महापालिकेतर्फे ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चन डस्टबीन खरेदी केली होती. मार्च २०१४ मध्ये ६ कोटी ५९ लाख ६१ हजार २८९ रुपये स खर्चुन ९ लाख ३० हजार ३४४ डस्टबीनची ले भांडार विभागामार्फत खरेदी करण्यात आली होती.
त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप त्यावेळीही झाले होते. दरम्यान, डस्टबीन वाटपानंतर ओला व सुका कचरा वेगळा करण्याच्या उद्देशालाच हरताळ पुन्हा फासला गेला. तरी देखील पुन्हा नव्याने डस्टबीन खरेदी करण्याचा घाट आरोग्य विभागाने घातला. दोन किंवा तीन डस्टबीन देण्याबाबतचा प्रस्ताव होता. डस्टबीन खरेदीसाठी सुमारे २० कोटी रुपयांचे तरतूद वर्गीकरण करून घेण्यात आली. या खरेदीप्रक्रियेवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले. तसेच यामध्ये राजकीय हितसंबधाचेही आरोप झाले. सत्ताधारी या प्रक्रियेमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने सध्यास्थितीत ही खरेदी रद्द करण्याची भूमिका घेण्यात आली. त्यानुसार स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी डस्टबीन लेखाशीर्षावरील १८ कोटी रक्कम पुन्हा घनकचरा व्यवस्थापन या लेखाशीर्षावर वर्ग करण्यात आली.















